तुळस बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित नसतील नक्की

नमस्कार मित्रांनो प्रत्येक हिंदूच्या दारासमोर तुळस ही असतेच. आपल्या संस्कृतीत तुळशीला पूजनीय पवित्र व देवी मानले जाते. त्यामुळे आपल्या दारात जर तुळस असेल तर तुम्हाला या गोष्टींची आठवण ठेवावीच लागेल. जर या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर आपल्यावर सर्व देवी-देवतांची कृपा होते. घरात सकारात्मक व आनंदी वातावरणाची निर्मिती होते.

घरात पैशांची अडचण राहत नाही. तर मित्रांनो चला पाहुया आपल्या शास्त्रांमध्ये तुळशी विषयी सांगितलेली महत्वाची माहिती. तुळशीची पाने आपण कधीही तोडतो व आपल्या उपयोगात आणतो किंवा पुजेत वापरतो. परंतु शास्त्रात काही दिवस तुळशीची पाने तोडण्यासाठी निषिद्ध सांगितलेले आहेत.

एकादशीला व रविवारी तुळशीची पाने कधी तोडू नये. तसेच सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या दिवशीही तुळशीची पाने तोडू नयेत. जर या पानाची आवश्यकताच असेल तर आदल्या दिवशीच पाने तोडून धुवून फ्रीजमध्ये ठेवावीत. जर गरज नसेल तर तुळशीची पाने तोडु नयेत. नाहीतर आपल्याला दोष लागतो.

गरज नसताना पाने तोडणे म्हणजे तुळशीला नष्ट करण्यासारखे आहे. रोज तुळशीची पूजा करावी. सकाळी स्नान झाले एक तांब्या पाणी तुळशीला अर्पण करावे व हळद कुंकू वाहावे. तसेच दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा. अशी मान्यता आहे की ज्या घरांमध्ये दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावला जातो.

त्या घरात देवी लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते. जर दारात तुळस असेल तर घरातील कितीतरी प्रकारचे वास्तुदोष निघून जातात आणि त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर पडत नाही. त्याबरोबरच आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारते. अशी मान्यता आहे की ज्या घरासमोर तुळस लावलेली असते. त्या घरावर कोणत्याही प्रकारची वाईट नजर पडत नाही.

त्याबरोबरच कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव ऊर्जा जाणवते. जर तुळस वाळली तर तिला घरामध्ये ठेवू नये. सुकलेले तुळशीचे रोप घरामध्ये ठेवणे अशुभ मानले गेले आहे. म्हणून जर दारातील तुळस वाळली असेल तर लगेच नदीत किंवा तलावात त्याचे विसर्जन करावे.

वाळलेले तुळशीचे रोप दारात ठेवल्यास घरातील बरकत निघून जाते. म्हणून घरात नेहमी हिरवीगार टवटवीत भरलेली तुळस लावावी. जर  वाळलेले तुळशीचे रोप काढले तर त्या ठिकाणी लगेचच दुसरे तुळशीचे रोप लावावे. तुळशीला फक्त अध्यात्मातच महत्त्व नाही तर आयुर्वेदातही तिला महत्वाचे स्थान आहे. तुळशीमध्ये कितीतरी औषधी गुणधर्म आहेत.

तुळशीमध्ये कितीतरी रोगांना दूर करण्याचे व त्यांचा प्रसार थांबवण्याचे गुण आहेत. घरात जर तुळस असेल तर घरातील वातावरण सुगंधी व पवित्र बनते व हवेत पसरलेले रोग पसरवणारे जीवजंतू या सुगंधाने नष्ट होतात. जर दररोज आपण तुळशीचा सुगंध घेतला तर श्वासोश्वासा संबंधित कितीतरी रोगांपासून आपले संरक्षण होते.

जर दररोज तुळशीच्या एका पानाचे सेवन केले तर आपण साध्या थंडी पासून दूर राहतो. वातावरणातील बदलांमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यापासून आपला बचाव होतो. तुळशीच्या पानाचे दररोज सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु यासाठी दररोज न चुकता तुळशीचे एक पान जरूर खावे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.