तुळशीचे लग्न कसे करावे, सोपी पद्धत जाणून घ्या

दिवाळी ही खर्‍या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात.

तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.


तुळशी विवाह विधी

तुळशीशी विवाह सोहळा कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.

तुळशी विवाह सोहळ्याचे महत्व, गोदानापेक्षा अधिक पुण्य लाभतं


कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तसं तर वर्षभरच तुळशीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्यानं इच्छित फलप्राप्ती होते. कार्तिकच्या महिन्यात तुळशीची नियमानं पूजा केल्यानं आणि दररोज दिवा लावल्यानं भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. 

अशी आख्यायिका आहे की कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं त्याची फलप्राप्ती गऊदानाच्या फलप्राप्ती पेक्षा कित्येक पटीने अधिक होते. कार्तिक महिन्यात शुक्लपक्षाच्या एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला तुळशीचे लग्न करतात. या दिवशी भगवान विष्णूं झोपेतून जागे होतात. म्हणूनच देव जागे झाल्यावरच तुळशीच्या लग्नाला पवित्र मुहूर्त मानतात. 

यंदाच्या वर्षी तुळशीचे लग्न गुरूवार 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. अशी आख्यायिका आहे की ज्या घरात तुळस असते अशा घरात यमदूत येत नाही. 


तुळशीचं लग्न शाळीग्राम सह झाले होते. म्हणून असे म्हणतात की जो कोणी भक्तीभावाने तुळशीची पूजा करतं, त्याला देवाचा आशीर्वाद मिळतो.


एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी तुळसला वर दिले होते की मला शाळीग्रामाच्या नावानेच तुळससह पुजतील आणि जो कोणी तुळशीच्या शिवाय माझी पूजा करेल त्यांचा नैवेद्य मी स्वीकारणार नाही.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.

अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.