तुम्हाला सतत लघवी लागत असेल तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा

प्रत्येक स्त्रीचं वॉशरुममध्ये अथवा लघवीला जाण्याचे वेळपत्रक निरनिराळं असू शकतं. दिवसभरात कमीत कमी सहा ते सात वेळा लघवीला होणं हे अगदीच सामान्य आहे. मात्र यापेक्षा अधिक वेळा जर तुम्हाला लघवीला होत असेल किंवा रात्रीच्या वेळीही सतत लघवीला जावं लागत असेल तर तुम्हाला यावर उपाययोजना करण्याची नक्कीच गरज आहे.

यासाठीच महिलांमध्ये आढळणाऱ्या या आरोग्य समस्येची कारणं आणि त्यावरील काही घरगुती उपचार जरूर जाणून घ्या. काही घरगुती उपचार करून तुम्ही तुमची ही आरोग्य समस्या कमी करू शकता. जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर यावर करण्यासारखा सर्वात महत्वाचा प्राथमिक उपाय म्हणजे लघवी रोखून ठेवू नका.

जेव्हा जेव्हा लघवीला जाण्याची ईच्छा होईल तेव्हा लघवीला जा. लघवीला जाणे टाळण्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. दर दोन ते तीन तासांनी तुम्हाला लघवीला जाणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही लघवीला जाणे टाळता तेव्हा मूत्राशयात लघवी साठून राहिल्यामुळे बॅक्टेरिआ निर्माण होतात.

जिऱ्यामुळे महिलांमध्ये युरिन इनफेक्शन नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी चमचाभर जिरे कपभर पाळण्यात उकळून घ्या. पाणी आटून अर्धे झाले की थंड करून ते प्या. यात थोडं मध टाका आणि दिवसातून दोनदा घ्या. कधीकधी मूत्रमार्गातील इनफेक्शमुळे तुम्हाला वारंवार लघवीला होतं. अशावेळी तुळशीच्या पानांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

कारण तुळशीच्या पानांच्या रसामुळे तुमचे इनफेक्शन कमी होऊ शकते. यासाठी सकाळी उठल्यावर दोन ते तीन तुळशीची पाने चुरडून त्याचा रस मधासोबत घ्या. व्हिटॅमिन सी आहारात मुबलक असेल तर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते.

कारण व्हिटॅमिन सीमुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्याचा महिलांना या आरोग्य समस्येशी लढण्यासाठी फायदा होऊ शकतो. यासाठीच आहारात आंबट फळे, भोपळी मिरची, ब्रोकोली अशा गोष्टींचा समावेश करा. आवळ्यामुळे मूत्राशय स्वच्छ होते आणि मू्त्राशयातील स्नायू मजबूत होतात.

सहाजिकच यामुळे तुम्हाला तुमच्या मूत्रपिंडावर नियंत्रण ठेवता येते. चांगल्या परिणामासाठी आवळ्याचा रस मधासोबत घ्या. आवळ्याचा रस आणि पिकलेली केळी दिवसातून दोनदा अथवा तीनदा खाण्यामुळेही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कॅनबेरी या बेरीजचा रस हा या समस्येवरील एक चांगला घरगुती उपाय आहे.

या ज्यूसमुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक इनफेक्शनचा धोका टाळता येऊ शकतो. कॅनबेरीमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे जंतूसंसर्ग रोखणे सोपे जाते. चांगल्या परिणामासाठी या रसात साखर घालणे टाळा. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते.

शिवाय यामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो. एका संशोधनानुसार भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यामुळे युरिनरि ट्रॅक इनफेक्शन अथवा त्यासंबधीत आजार बरे होऊ शकतात. तीळाचा वापर केल्यामुळे तुम्हाला या समस्येपासून नक्कीच सुटका मिळू शकते.

तिळामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या मूत्राशयाचे कार्य सुधारण्यात मदत होते. जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर तीळ आणि गुळ मिक्स करा आणि दिवसातून दोनदा घ्या. संक्रातीला आपण तिळगूळ वाटतो ती एक प्रथा नसून ते तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम असते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.