मित्रांनो सर्व संकटांवर मात करणारी स्वामींची एक शक्ती आहे. तो म्हणजे स्वामींचा मंत्र स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र असून सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. प्रत्येकाने दररोज या मंत्राचा 15 मिनिटे जप करावा. याला वयाची अट नाही.
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मनोभावे केल्यास त्याचे अनेक फायदे अनुभव येतातच. सर्व दुःख निवारण होते. ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात. आपले रक्षण करतात व त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे भय व संकट येत नाही.
स्वामींवर अटल विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या आधार वडाची प्रचिती आजही भक्तांना येते. म्हणून मित्रांनो या कठीण या वाईट काळात कठीण वेळ आपल्यावर समाजावर या जगावर आलेली आहे. त्या वेळेवर त्या संकटावर मात करण्यासाठी एकच शक्ती आहे.
श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र हे नाम खूप शक्तिशाली आहे. याचा जप दररोज करा. माळ असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही. मुखात नाम ठेवा काम करताना उठता-बसता चालताना कुठेही असाल मुखात तेथे श्री स्वामी समर्थ मंत्र मुखात ठेवा.
किंवा तुम्हाला वेळ नसेल तर 15 मिनिटे रोज काढा दिवसातून तुम्ही कधीही 15 मिनिटे वेळ काढून मंत्राचा जप मनोभावाने करू शकता आणि हा जप करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. संकट तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही.
तर मित्रांनो तुम्ही या नामजपाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.