पॉवरबॅंक जवळ नसेल तर अशी टिकवा फोनची बॅटरी… या टिप्स ठरतील उपयोगी…

लॉकडाऊन आधी मुलांना मोबाईल फोन पासून लांब ठेवणारे पालक आता ऑनलाईन शिक्षणासाठी स्वतःच मुलांच्या हातात मोबाईल फोन देऊ लागले आहेत.

कोरो नाच्या  काळात मोबाईल फोनची गरज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सारखीच वाढली आहे.

या काळात कित्येक महिने एकमेकांपासून दूर असलेल्या लोकांसाठी मोबाईल फोन म्हणजे जणू एखाद्या जीवलग मित्रासारखाच झाला आहे.

फक्त बोलण्यासाठीच नाही तर साधा अलार्म लावण्यासाठी, न्यू ज पाहण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आणि अगदी मुलांना शिक्षणाचे धडे देण्यासाठीही आजकाल मोबाईल अत्यंत गरजेचा आहे.

अशा वेळी घराबाहेर असताना दिवसभर मोबाईल व्यवस्थित सुरू राहावा यासाठी त्याची बॅटरी टिकवणं म्हणजे एक कसरतीचंच काम झालं आहे.

कारण तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही तुमचा फोन पटकन चार्ज करू शकता मात्र बाहेर असताना तुम्हाला फोनची संपत आलेली बॅटरी टिकवूनच ठेवावी लागते.

कारण फोन हे संपर्क साधण्याचे महत्वाचे साधन आहे. याबाबत आता काळजीचं काहीच कारण नाही कारण बाहेर असताना जर तुमच्याजवळ पॉवरबॅंक नसेल तर तुम्ही या ट्रि क्स वापरून बॅटरी सेव्ह करू शकता.

ब्लू टु थ आणि लोकेशन सर्व्हिस बंद ठेवा

फोनमध्ये अनेक फिचर असतात. त्यापैकी ब्लू टु थ आणि लोकेशन सर्व्हिसचा तुम्हाला नक्कीच फायदा  होतो. पण जेव्हा या फिचर्सचा वापर करत नसाल तेव्हा ते फिचर्स बंद ठेवा ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपणार नाही.

ब्राई टनेस कमी करूनही तु्म्ही तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता.

नको असलेले बॅकग्राऊंड ऍप बंद ठेवा

मोबाईलमध्ये आजकाल सर्व ऍप डाऊनलोड करणं ही काळाची गरजच आहे. कारण कुठल्या ऍपची तुम्हाला कधी गरज लागेल हे सांगता येणार नाही.

पण बाहेर असताना जर तुमची बॅटरी लो असेल तर सर्व बॅकग्राऊंड ऍप बंद ठेवा. कारण ऍप्समुळे तुमच्या फोनचं प्रोसेसर सुरू राहतं.

सहाजिकच यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी वापरली जाते. प्रोसेसर युज कमी करून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी सेव्ह करू शकता.

लाईव्ह वॉ ल पे प र से ट करू नका

सध्या निरनिराळ्या टाई प्सच्या वॉ लपेपर्सचा ट्रें ड आहे. फो नमध्ये ला ईव्ह वॉ लपेपर से ट केल्यामुळे तुम्हाला फो न वापरताना फ्रे शनेस मिळू शकतो.

मात्र जर तुमची बॅ टरी संपत आली असेल आणि तुम्ही फो न लवकर चा र्ज करू शकत नसाल तर हे ला ईव्ह वॉ लपेपर अ नसेट करा.

कारण यामुळे तुमच्या डि स्प्लेची हा अर फ्रि क्वें सी अप डेट होते. ज्यामुळे तुमच्या फो नची बॅ टरी कमी होऊ शकते.

डि स्प्ले फि चर बंद ठेवा

तुमच्या डि स्प्ले फि चरमध्ये अनेक गोष्टी असतात ज्यांचा  तुम्हाला फायदा होतो.

तारिख, वेळ, बॅ टरी किती उरली आहे, एखादे अप डे ट तुम्हाला यातून लगेच समजते.

मात्र जर तुम्हाला बाहेर असताना फो नची बॅ टरी टिकवायची असेल तर हे फि चर्स काही काळासाठी बंद ठेवा.

पॉ वर से व्हिं ग मो ड ऑ न करून तुम्ही हे सर्व फि चर्स बंद ठेवू शकता.

तेव्हा त्या या टि प्स फॉ लो करा आणि वाचवा तुमच्या फो न ची बॅ टरी. या टि प्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.