वाढलेले पोट सपाट चरबी आपोआप गायब वेगवेगळे घरगुती उपाय

आज मी आपल्यासाठी वाढलेले पोट कमी करण्यासाठी खूपच सुंदर अश्या छोट्याछोट्या न्याचरल टिप्स घेऊल आले आहे. जर या टिप्सचा तुम्ही वापर केला तर तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे आणि या टिप्स अगदी न्याचरल व अगदी घरगूती आहेत.

म्हणून याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता. आपल्याला यपा पासून पूर्णपणे फायदा देखील होणार आहे. पोट कमी करण्यासाठी आळशी ही खूप महत्वपूर्ण आहे. आळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स आळशीमध्ये ओमेगा 3 आयर्न यांचे प्रमाण भरपूर असते.

तसेच व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी6, आयर्न, पोटयाशीयम, कॉपर, झिंक, व्हिटॅमिन इ, ओमेगा 3 फॅटेऍसिड ही तत्व देखील भरपूर प्रमाणात आळशीमध्ये आढळतात. ज्या प्रमाणे आपण बडीशोपचा वपर करतो त्या प्रमाणे भाजून जर तुम्ही दिवसभरातून कधीही एक चमचा भरून आळशीचे सेवन करत गेलात. तर या मुळे फुगलेले पोट असो वाढलेले पोट असो हे हळूहळू कमी होण्यास मदत होते. तसेच मधुमेह अल्झायमर व कॅन्सर यांचा धोका देखील या मुळे टळतो.

किंवा आळशीच्या चटणीचा देखील तुम्ही वापर करू शकता. तसेच दुसरा पदार्थ म्हणजे दूध दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तज्ञांच्या मते शरीरातील फॅट्स कमी करण्यास खूप उपयुक्त ठरते. यामुळे रोज रात्री एक ग्लास भरून दूध पिणे हे खूप फायदेशीर ठरते.

आणि यामुळे शरीरातील फॅट्स तर कमी होतातच. परंतु पोटचा घेर देखील कमी होतो व यामुळे झोप देखील शांत लागते. तसेच अननस, काकडी हे देखील पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त मानलेगेलेे आहे.

काकडी व आननस मध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन हे भरपूर प्रमाणात असून यामध्ये पाणी देखील भरपूर असते आणि यामुळे शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत जे नको असलेले घटक आहेत. ते बाहेर काढण्याचा काम काकडी व अननस करत असतात.

व यामुळे वाढलेले वजन व वाढलेला पोटाचा घेर हे कमी होण्यास मदत होते. आणि काकडीमूळे पचन देखील व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच मासे मासे खाल्याने देखील शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते.

कारण मास्यांमध्ये देखील ओमेगा 3फॅटेऍसिड व प्रोटिन हे भरपूर प्रमाणात असते तसेच कॅल्शियम देखील यामध्ये आढळते आणि मासे खाल्यामुळे डोळे देखील निरोगी राहतात व शरीरातील फॅट्स वाढत नाहीत.

म्हणूनच किमान आठवड्यातून एकदातरी मास्यांचे सेवन करत चला. आणि लसूण लसूण देखील आपल्या शरीर करता खूप उपयुक्त आहे. लसूणमध्ये कॅल्शियम, कॉपर, पोटयाशीयम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन बी ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात.

गावटी लसूनच्या जर तुम्ही 2 पाकळ्या दररोज सकाळी अनाशापोटी चावून चावून खाल्या आणि यावर एक ग्लास भरून कोमट पाणी पिले तर यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी होते पोटाचा वाढलेला घेर कमी होतो.

रक्त शुद्ध होते, रक्त पातळ होते, शरीरातील ब्लॉकेज निघून जातात व हृदयविकारा सारख्या समस्या आपल्याला होत नाहीत. सोयाबीन आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा देखील वापर भरपूर प्रमाणात करत चला.

कारण यामुळे अतिरिक्त भूक ही कमी होते व यातील प्रोटीन आणि कॅल्शियम आपल्या शरीर करता खूप उपयुक्त ठरते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होते व सोयाबीन हे पचायला देकखिल हलके असते.

तसेच बडीशोप बडीशोपमध्ये फायबर, आयर्न, म्यांग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि यामुळे पचन शक्ती व्यवस्थित होते. जेवणा नंतर एचमचा भरून बडीशोप खाणे हे खूप योग्य आहे. परंतु बडीशोपचा वापर करताना बडीशोप चावून चावून अगदी बारीक करायची आहे.

म्हणजेच लाळे बरोबर ती मिक्स व्हायला हवी इतपत चावून चावून खायचे आहे. यामुळे आपल्या शरीराला याचा पूर्ण पणे फायदा होतो व पचन देखील यामुळे व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच टम्याटो देखील अपम्य शरीरा करता खूप उपयुक्त आहे टोम्याटोचे सूप किंवा स्यालड हे सुटलेले पॉट नियंत्रणात आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कारण टम्याटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक भरपूर प्रमाणात आढळतात आणि टम्याटोमूळे स्किन देखील सुंदर आणि सॉफ्ट होण्यास मदत होते.

तसेच दही रोजच्या आहारात आपण दह्याचा वापर केला तर आपल्या शरीरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढेल. आणि जर शरीरात कॅल्शियम वाढले तर फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित राहतील. म्हणजेच कॅल्शियम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.

आणि यामुळे सुटलेल्या पोटलेल्या नियंत्रण ठेवण्यास दही ये अत्यंत उपयुक्त आहे. तसेच जिरे जिऱ्यामध्ये देखील व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी3, कॅल्शियम, पोटयाशीयम, म्यांग्नेशियम, झिंक, आयर्न, कार्बोहायड्रेट ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात.

पोटांचे विकार, पचन शक्ती, गॅस, ऍसिडिटी या त्रासा पासून सुटका करण्यासाठी जिरे खूप उपयुक्त ठरतात. जिरे भाजून याची पावडर करा. अर्धा चमचा पावडर यामध्ये एक चमचा भरून मध व अर्धा चमचा भरून साजूक तूप टाकून ते जर तुम्ही खाल्ले तर यामुळे पोटांचे विकार बरे होतात.

व वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वजन वाढलेले असो किंवा पोटाचा वाढलेला घेर असो हे कमी करण्यासाठी पाणी भरपूर पितचला थंडीचे दिवस असतील तर यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. जर उन्हाळा असेल तर गरम करून थंड केलेले पाणी तुम्ही पिऊ शकता.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.