विमान तासभर हवेतच, प्रवासी अक्षरक्ष: रडले, तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न निष्फळ!

कधीकधी असं काहीसं घडतं की ज्याची आपण कधीच कल्पनाही केली नसेल. असाच काहीसा अनुभव शनिवारी (20 मार्च) अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटमध्ये बसलेल्या प्रवाशांना आला. पायलटने त्यांचं विमान राजस्थानच्या जैसलमेर विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काही तांत्रिक कारनास्तव ते लँड होऊ शकलं नाही. पायलटने पुन्हा लँड करण्याचा प्रयत्न केला. पायलटने पुन्हा आकाशात झेप घेतली. त्यानंतर पुन्हा विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा तीच समस्या झाली. त्यामुळे दुसराही प्रयत्न अयशस्वी ठरला. पायलटने पुन्हा तिसरा प्रयत्न केला. पण तिसराही प्रयत्न यशस्वी न झाल्याने विमानाला अहमदाबादला आणलं गेलं.

स्पाईसजेटचं एसजी 3012 फ्लाईटने शनिवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी अहमदाबादच्या विमानतळावरुन जैसलमेरच्या दिशेला उड्डाण घेतली. हे विमान जवळपास दुपारी एक वाजेच्या सुमारास जैसलमेरच्या विमानतळाजवळ पोहोचलं. पायलटकडून तीनवेळा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला गेला. मात्र, तांत्रिक कारणामुळे विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही

जैसलमेरच्या विमानतळाजवळ विमान जवळपास एक तास हवेत घिरक्या मारत होतं. तरीही पायलटने धीर सोडला नाही. त्यानंतर पुन्हा अहमदाबादला विमान नेण्यात आलं. तिथे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली.

त्यानंतर दोन तासांनी दुसऱ्या पायलटद्वारे पुन्हा जैसलमेरच्या दिशेला विमानाने उड्डाण घेतली. तिथे संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली.

तेव्हा प्रवाशांनी सूटकेचा श्वास सोडला

Leave a Reply

Your email address will not be published.