उसाच्या रसाचे 12 आयुर्वेदिक फायदे विश्वास बसणार नाही तुमचा

मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बाजारातील शीतपेये भरपूर प्रमाणात पीत असता. परंतु याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हस असतात. म्हणजेच जास्ती दिवस हे पेय टिकावीत म्हणून याच्या मध्ये प्रिझर्वेटिव्हसचा वापर केलेला असतो आणि असे हे प्रिझर्वेटिव्हस आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्याचबरोबर त्यातील इतर घटक ही आपल्या शरीरासाठी काही चांगली नसतात.

वजन वाढवण्यासारखे दुष्परिणाम या शितपेया त्यामुळे होत असतात. त्यामुळे निसर्गातील थंड पेय आपण पिली पाहिजेत. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असेच एक पेय घेऊन आलेलो आहे आणि ते म्हणजे उसाचा रस. मित्रांनो या उसाच्या रसाचे तुमच्या शरीराला किती फायदे आहेत. हे मी तुम्हाला आज सांगणार आहे.

मित्रांनो सगळ्यात मोठा जो या रसाचा फायदा आहे. जर हा रस तुम्ही नियमित घेत असाल जर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असेल तर तो कमी होत असतो. स्पेशली स्त नाचा जो कॅन्सर आहे. तो होण्यापासून उसाचा रस तुमचा बचाव करतो. त्यामध्ये असलेले कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, मँगनीजचे जे प्रमाण आहे. या घटकांमुळे स्त नाच्या कॅन्सर वाढीसाठी ज्या पेशी कारणीभूत असतात.

त्या पेशींची वाढ कमी करण्याचे काम हे घटक करत असतात. त्यामुळे तुम्हाला कॅन्सर नक्कीच होणार नाही. त्यामुळे नियमितपणे उसाचा रस घेतला तर ज्यांना लघवीचा त्रास आहे म्हणजे ज्यांना युरिन इन्फेक्शन आहे. लघवी मध्ये जळजळ होते त्यांनी लिंबाचा रस व उसाचा रस जर एकत्र घेतला. तर त्यांना युरिन इन्फेक्शन तर होणारच नाहीये.

त्याचबरोबर मूतखडा होण्यापासून सुद्धा बचाव होणार आहे. उसाचा रस हा शरीरासाठी एकदम पौष्टिक असतो. त्याच्यामध्ये ग्लुकोज, सुक्रोज, मिनरल्स, विटामिन बी आणि ऑरगॅनिक ॲसिड असते आणि म्हणून चांगल्या प्रकारे पोषण होत असते. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. ज्या व्यक्तींची पचनशक्ती वीक आहे.

अशा व्यक्तीने उसाचा रस नियमित घेतला पाहिजे. उसाच्या रसातील पोटॅशियम या घटकामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे बद्धकोष्टता होण्याचा जो त्रास आहे तो कमी होतो. त्याचबरोबर ज्यांना पित्ताचाही खूप त्रास आहे अशा लोकांनीही दोन वेळेस जर उसाचा रस घेतला तर नक्की तुमचा पित्ताचा त्रास कमी येईल.

उसाचा रस तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. त्यामुळे हृदयाचे विकार कमी आहेत हार्ट स्ट्रोक हार्ट अटॅक यांसारखे विकार तुम्हाला होण्यापासून बचाव होतो. या उसाचे कितीतरी फायदे आहेत आणि म्हणून उसाचा रस आपण दररोज घेतला पाहिजे. शरीरातील टॉक्सिक घटक सुद्धा बाहेर काढण्याचे काम उसाचा रस करत असतो.

म्हणजेच आपले शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. पाण्याची कमतरता बऱ्याच वेळा आपल्याला उन्हाळ्यामध्ये भासते आणि म्हणून तुम्ही जर उसाचा रस घेत असाल तर डीहायड्रेशन पासून तुम्ही नक्की वाचणार आहात. यातील हाय मिनरल्समुळे तुमच्या दातातील कीड यापासून तुमचं संरक्षण सुद्धा उसाचा रस करत असतो.

ग्लॉयकॉलिक ऍसिडमुळे तुमची त्वचा ताजी तजीलदार दिसते. मंडळी उसाचा रसामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी पावर वाढते आणि तुम्हाला वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. मित्रांनो आपण लहान मुलांना चॉकलेट आईस्क्रीम इत्यादी पदार्थ देत असतो.

परंतु ते सुद्धा त्यांच्या शरीरासाठी नक्कीच चांगले नसतात आणि म्हणून आपण लहान मुलांना उसाचा रस नैसर्गिक जसे ताक ऊस नैसर्गिक पदार्थांची सवय लावली तर तेसुद्धा या लहान मुलांसाठी अगदी लाभदायक असतात आरोग्यदायी असतात. आज मी तुम्हाला 10 ते 12 उसाच्या रसाचे फायदे सांगितले आहेत.

आता निर्णय तुमचा आहे. बाजारातील शीतपेय पिऊन आजारी पडायचे शरीरावर वाईट परिणाम करून घ्यायचे की निसर्गात सहज उपलब्ध असलेला उसाचा रस. उसाच्या रसाची चव तुम्हाला जर आवडत नसेल तर त्यात थोडंसं सेंदवमिठ टाकून जर तुम्ही पिले तर नक्कीच त्याची चव चांगली लागते.

आणि अजून तुमच्या पचनशक्ती मध्ये सुधारणा देखील होत असते. म्हणून उसाचा रस पीने सुरुवात करा आनंददायी आरोग्यदायी रहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.