सुंदर दिसण्यासाठी हा स्वस्त आणि मस्त उपाय आवश्य करा, जाणून घ्या हे आहेत ८ फायदे

पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात बदल झाल्याने अनेक आजार पसरतात. सर्दी-पडसे आणि कोरडी त्वचा या समस्या होतात. परंतु वाफ घेतल्याने या समस्या दूर होऊ शकतात. एवढेच नव्हे तर वाफ घेतल्याने तुमचे सौंदर्य सुद्धा खुलून दिसेल. रोज किंवा आठवड्यातून ३ वेळा वाफ घेतली तर आरोग्याचे अनेक फायदे होऊ शकतात. हे फायदे कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.

अशी घ्या वाफ
वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात तीन किंवा चार ग्लास पाणी घेवून ते गरम करून घ्या. डोक्यावर कॉटनचा टॉवेल टाकून भांड्यावरील झाकन काढून पाच ते दहा मिनिटे वाफ घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळा वाफ घेऊ शकता.

वाफेचा असा होतो परिणाम
गरम पाण्याची वाफ नाकातून शरीरात जाऊन उष्णता निर्माण करते. आणि खराब बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे कफ किंवा सर्दीमध्ये आराम मिळतो. स्किन पोर्स ओपन झाल्याने त्यातील घाण बाहेर पडते. यामुळे चेहरा सुंदर दिसतो. त्वचा निरोगी होते.

हे होतील फायदे

 कोरडी त्वचा मऊ होईल

 सर्दी-पडशापासून बचाव होईल

 त्वचेची चमक वाढेल

 तारूण्यपिटीका दूर होतील

 दम्याची समस्या दूर होईल

 ब्लॅक हेड्स दूर होतील

 त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतील

 सुरकुत्या कमी होतील

त्वचा मुळापासून स्वच्छ होते

चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे त्वचेवरील पोअर्स ओपन होतात. निरोगी त्वचेसाठी त्वचेखालील नैसर्गिक तेलांची (Sebum) ची निर्मिती होणं गरजेचं असतं. मात्र जर तुमच्या त्वचेची रोमछिद्रे धुळ, माती, प्रदूषण अथवा अती मेकअपमुळे बंद झाली असतील तर अशा त्वचेमध्ये नैसर्गिक तेलाची निर्मिती करण्यात अडचणी येतात. त्वचेची रोमछिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेला पुरेसे ऑक्सिजनदेखील मिळत नाही. मात्र चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे ही रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचेमध्ये Sebumच्या निर्मितीतील अडथळा दूर होतो.


टीप : वाफ घेतल्यानंतर हवेत किंवा धुळीत फिरू नका. कारण वाफ घेतल्यामूळे तुमच्या चेहेऱ्यावरील रोमछिद्रे ओपन झालेली असतात असतात. जेव्हा तुम्ही हवेत किंवा धुळीत फिरता तेव्हा हवेतील कण पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर जाऊन बसतात.

Leave a Reply

Your email address will not be published.