हिवाळ्यात चेहर्‍याची काळजी कशी घ्याल?

कोणताच चेहरा कोणत्याही ऋतूचा मार सहन करू शकत नाही. यासाठी चेहर्‍याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यातील थंडिने त्वचा एकदम शुष्क होते. त्वचेची नमी कायम राखण्यासाठी पुरेसे पाणी प्या. माँइश्चराइजर लावा. फेशिअल करा. ग्लिसरीन व कोल्ड क्रिम चेहर्‍याला लावा. वेळ मिळेल तेव्हा केस शाम्पूने स्वच्छ धुवा. थंडित त्वचेची जितकी जास्त काळजी घ्याल तितके ती सुंदर दिसेल. 

सुंदर दिसणे हे काही वेळेस कठिण वाटू शकते. कारण जोपर्यंत तुम्ही त्या ऋतूप्रमाणे स्वत:ला तयार करतात तो पर्यंत तो ऋतू बदलून जातो. परत तुम्हाला नव्याने सुरूवात करावी लागते. तुमचे केस व त्वचा वर्षभर सुंदर दिसण्यासाठी लक्षात ठेवात्या ऋतूच्या विरूध्द वागू नका. असे म्हणतात की क्वांरच्या दिवसांमध्ये संगमरमरही कोमेजते. अशात तुमची नाजूक त्वचा कशी वाचू शकते? 

क्वांरचा महिना संपण्यात असतो व थंडीची पूर्ण सुरूवातही झालेली नसते. अशा बिन भरवशाच्या ऋतूत शुष्क त्वचा व बेजान होणार्‍या केसांमुळे सुंदर चेहरा सुध्दा विचित्र दिसायला लागतो. त्यात रस्त्यांवर पडलेली धुळ चेहर्‍याचे संतुलन पूर्णपणे बिगडते. 

त्वचेची नि-गा

 सगळ्यात आधी ऋतूनुसार आपले फेस वाँश व माँइश्चराइजर क्रिम बदलवा. सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर जाऊ नका. महिन्यातून एकदा फेशिअल जरूर करा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल. शुष्क त्वचेला लवकर सुरकुत्या पडतात. यामुळे चेहरा धुतल्यानंतर टोनर व कोल्ड क्रिमचा वापर करा. मेकअप करण्याचे प्रमाण कमी करा. ऋतू बदलण्याने त्वचा लवकर सुकून जाते. अल्ट्रावाँयलेट किरणांमुळे त्वचेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या ऋतूत त्वचा काळी पडण्याचीही भिती असते. यामुळे फेशिअल करतांना सोनोफोरेसिस थेरेपी चा प्रयोग करायचा प्रयन्त करा. यात विटामिन सी व लैक्टिक अँसिडचा वापर केला जातो. कमीत कमी 10 ग्लास पानी रोज प्या. रोजच्या आहारात फ्रुट ज्युसचा समावेश करा. 

शरीराची काळजी

त्वचेची निगा राखण्याच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम असतो. बाँडी लोशन साठी कोका बटर व शिया बटर या क्रिमचा वापर करा. नखांची काळजी घ्या. रात्री विटामिन ई आँइलचा वापर करा. वर्षभर सुंदर दिसणे सुंदर नसते. फक्त स्वत:कडे थोडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही वर्षभर सुंदर दिसाल. 

केसांची निगा 
या ऋतूत धुळीमुळे केस शुष्क होतात. यापासून वाचण्यासाठी रोज केस धुवा. कंडिशनर लावा. केस चांगले कोरडे करा. घाम व केसांची काळजी न घेतल्यामुळे कोंडा होतो. यापासून वाचण्यासाठी केस रोग विशेषज्ञांचा सल्ला घ्या. केसांची समस्या लक्षात घेवून पार्लरमधून हेअर ट्रिटमेंट करा. आठवड्यातून एक दिवस तेलाने मालिश करा.

Leave a Reply

Your email address will not be published.