या तेलाचा वापर करा काळे झालेले ओठ कायमस्वरूपी गोरे होतील

त्वचेच्या काळजीसह आपल्या ओठांची काळजी घेणेही तितकंच गरजेचे आहे. कोणताही ऋतू असो ओठांची काळजी प्रत्येक हंगामात घ्यावी लागते. विशेषतः कोरडेपणा आणि सनटॅनपासून वाचणं अत्यंत गरजेचे आहे. ओठांची काळजी नीट घेतली गेली नाही तर ओठ काळे पडतात. ओठांच्या काळजीसाठी अनेक महिला ओठांवर लिप बामचा वापर करतात.

पण या लिप बाममध्ये अनेक केमिकल्स मिक्स असतात आणि त्यामुळे ओठ अधिक काळे पडतात. तुमचेही ओठ काळे पडले असतील तर यावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाचा कसा उपयोग करायचा आणि ओठांचा काळेपणा जाण्यासाठी याचा नक्की कसा फायदा होतो हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

तिळाच्या तेलामध्ये सेसमोल आणि सेसमिनोल आढळते जे ओठांना अधिक मऊ आणि मुलायम बनवते. तेलामध्ये अँटिऑक्सिडंट असते. त्वचेवरील सूज कमी करण्यासाठी तिळाचे तेल अतिशय परिणामकारक ठरते. तसंच हिवाळ्यातही त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करता येतो. हिवाळ्यात त्वचा अधिक फाटते. यावेळी तिळाच्या तेलाचा चांगला वापर करता येऊ शकतो.

तिळाचे तेल हे मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. तिळाच्या तेलामध्ये हिलिंग घटकही असतात. त्यामुळे फाटलेल्या ओठांवर याचा चांगला परिणाम होतो. यामध्ये आढळणारे विटामिन ई हे सनबर्न कमी करण्यास मदत करते. केवळ ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी तिळाच्या तेलाचा खूपच चांगला फायदा होतो.

त्यामुळे नियमित याचा वापर करावा. लिप स्क्रब बनविण्यासाठी एक लहान चमचा साखर आणि अर्धा चमचा तिळाचे तेल मिक्स करा. पण हे मिक्स करण्यापूर्वी साखर तुम्ही क्रश करून घ्या. त्यामध्ये तेल मिक्स करा. या मिश्रणाचा वापर तुमच्या ओठावर करून हलक्या हाताने स्क्रब करा.

1 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. आठवड्यातून 3 वेळा तुम्ही या लिप स्क्रबचा वापर करू शकता. तीळ आणि नारळाच्या तेलाचा लिप बाम बनवण्यासाठी एक लहान चमचा तिळाचे तेल. अर्धा चमचा नारळाचे तेल. एका बाऊलमध्ये दोन्ही तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण ओठांना लावा.

या मिश्रणाने आपल्या ओठांना दिवसातून दोन वेळा मसाज करा. यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओठांवर हा लिप मास्क नक्कीच लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. हळद आणि तिळाच्या तेलाचा लिप मास्क बनवण्यासाठी अर्धा चमचा तिळाचे तेल.

चिमूटभर हळद. एका बाऊलमध्ये तिळाचे तेल आणि हळद मिक्स करून घ्या. हा घरगुती लिप मास्क ओठांवर लावा. अर्धा तास तसंच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने ओठ स्वच्छ करा. टॅनिंगमुळे ओठ काळे झाले असतील तर या लिप मास्कने ओठांचा नैसर्गिक रंग परत येईल. तुमचे ओठ गुलाबी होतील आणि त्याशिवाय मऊ आणि मुलायम राहतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.