या वस्तु देवघरात ठेवा कधीच धन कमी पडणार नाही

आपण खुप श्रीमंत व्हावे खूप धनवान व्हावे इतर लोकांमध्ये आपला मान सन्मान वाढावा. आपले नाव व्हावे असे सर्वांनाच वाटते. तसे काहींच्या बाबतीत होत ही परंतु काही व्यक्तींनी कितीही कष्ट केले मेहनत केली तरी त्यांना त्याचे फळ मिळत नाही. पैसा भरपूर आला तरी तो टिकत नाही. ज्या प्रकारे येतो त्याच प्रकारे निघूनही जातो.

बचत काहीही राहत नाही. पैसा घरात आला की लगेच आजारपण एखादे नुकसान हे ठरलेलेच असते व लगेचच तो पैसा निघून जातो. पण काही व्यक्तींच्या कष्टाचे म्हणावे तसे फळच मिळत नाही. खूप कष्ट केले तरी ही पैशांची आवक जेमतेमच असते. काही केले तरीही परिस्थितीत बदलच होत नाही.

अशा वेळी माणूस नाराज होतो काय करावे हे आपल्याला सुचत नाही. मग आपण बुवा बाबांकडे जाऊ लागतो व त्यात गुरफटतो परंतु काही व्यक्ती भगवंतांकडे वळतात भगवंतांची पूजा आराधना करतात. मग भगवंत त्यातुन मार्गही दाखवतात. परंतु नुसते भगवंतांचे पूजन करून काहीही होणार नाही.

त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. म्हणजे आपली पूजा पूर्ण होईल. आपल्या कष्टाचे आपल्याला योग्य फळ मिळेल. त्यातील पहिला उपाय म्हणजे देवघरात देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. काही व्यक्तींच्या घरात देवी लक्ष्मीचा फोटो असतो परंतु फोटो असेल तर त्याची व्यवस्थितपणे पूजा करता येत नाही.

म्हणून लक्ष्मी देवीची मूर्ती असावी. ती मूर्ती कमळामध्ये बसलेली असावी. लक्ष्मी देवीची उभी मूर्ती कधीही ठेवू नये. कारण लक्ष्मी म्हणजेच पैसा उभ्याउभ्यातूनच घरातून निघून जातो. त्यात काहीच शिल्लकच राहत नाही. त्याबरोबर देवीचे पाय दिसू नयेत. ते कामळामध्ये पूर्ण झालेले असावेत.

म्हणजे पैसा घरात टिकून राहतो. लक्ष्मी देवीचे दररोज यथायोग्य पूजन करावे व प्रत्येक शुक्रवारी देवीची आरती करून दीप धूप लावुन नैवेद्य म्हणून 5 फळे मिठाई यापैकी काहीतरी नैवेद्य द्यावा. यामुळे देवी प्रसन्न होते. नैवेद्याला केलेला पदार्थ पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून खाऊन घ्यावा.

असे दर शुक्रवारी करावे यामुळे तुमची पैशांची आवक वाढेल. घरात पैशाची रेलचेल होईल व आर्थिक अडचण कधीही येणार नाही. दुसरा उपाय कोणत्याही महिन्याच्या बुधवारी गणपती मंदिरात जाऊन बाप्पांचे पूजन करावे. धूप दीप व नैवेद्य दाखवावा मग 101 किंवा आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे तेथे दक्षिणा ठेवावी.

मग मंदिरातील पुजारी कडून एक रुपया मागून घ्यावा व घरी आणून तो एक रुपया ठेवून त्यावर देव सुपारी ठेवून देवघरात मांडावा व त्याचे रोज पूजन करावे. यामुळे आपल्या घरात पैशांना बरकत येते. नवनवीन पैशांचे मार्ग मोकळे होतात व तिजोरीतील पैशांमध्ये वाढ होते.

तुम्ही तुमच्या देवघरात देवांना फुले अर्पण करत असालच परंतु दररोज एका मंदिरात जाऊन भगवंतांना फुले अर्पण करावीत व तेथील भगवंतांना वाहिलेले एक फुल उचलून घरी आणावे. संध्याकाळी ते फुल आपल्या देवघरात ठेवावे. असे दररोज केल्याने तुमच्या घरामध्ये भरभराट येइल सुख समृद्धी व वैभव मिळेल.

जर हा उपाय दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान एक वेळा तरी हा उपाय जरूर करावा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.