जाणून घ्या आहारात गव्हाचा समावेश असूनही कसं कमी होईल व जन…

वज न कमी करायचं म्हणजे आहारात अनेक बदल करावे लागतात. त्यातल्या त्यात भारतीय डा एटचा विचार केला तर अशा आहारातून ‘गहू’ वगळून अजिबात चालत नाही.

गव्हामध्ये असलेल्या ग्लु टेनमुळे व जन कमी करण्यास अडथळा येतो. पण गहू आहारात ठेवूनही तुम्ही व जन कमी करु शकता.

आता गव्हाचा नेमका कोणत्या पद्धतीने समावेश केल्यामुळे तुमचे वज न वाढणार नाही आणि तुमचे व जन नियंत्रणात राहील याची महत्वाची माहिती आज जाणून घेऊया.

गव्हामध्ये काय असते?

गहू हे असे अन्नधान्य आहे ज्याचा समावेश भारतीय आहारात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. गव्हापासून बनवलेल्या पोळीचा आहारात अगदी हमखास उपयोग केला जातो.

प्रत्येक भारतीय जेवणात भाजी-पोळी ही असतेच. आता पोळी बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असली तरी देखील त्यात असलेले काही पौ ष्टिक घटकही शरीराला आवश्यक असतात.

त्यामुळेच गहू हे काही केल्या टाळता येत नाही. गव्हाच्या पौ ष्टिक घटकांचा विचार केला तर गव्हामध्ये प्रो टीन आणि फाय बर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळासाठी भरल्यासारखे वाटते.

पण पोळीमध्ये म्हणजेच गव्हामध्ये असलेल्या फाय बरचीही तुमच्या शरीराला तितकीच गरज असते. पण पोळीचे सेवन अति केल्यामुळेही तुमच्या शरीरातील सा खर वाढून तुम्हाला काही त्रास होण्याची शक्यता असते.

असा करा गव्हाचा तुमच्या आहारात समावेश

गहू हे काही केल्या तुम्हाला डाए टमधून काढून टाकता येत नसतील तरी काही हरकत नाही तुम्ही काही टि प्स आणि ट्रि क्स फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा इतका त्रास होणार नाही.

गव्हापासून तयार केलेल्या पोळ्या तुम्ही खात असाल तर त्याची संख्या कमी करा. म्हणजे तुम्ही सकाळी गव्हाच्या पोळ्या खात असाल तर त्या खाण्यास काहीच हरकत नाही. पण दिवसाच्या सगळ्या वेळांमध्ये तुम्ही पोळी खाऊ नका.

दोन पोळ्या या कोणत्याही व्यक्तिसाठी पुरेशा असतात. एका जेवणामध्ये तुम्ही पोळ्या खात असाल तर दुसऱ्या जेवणामध्ये पोळ्या टाळता आल्या तर फारच उत्तम.

पोळ्या नुसत्या खात असाल तर  असे करु नका. त्यापेक्षा तुम्ही पोळ्या भरपूर सॅ लेड आणि भाज्यांसोबत खा. म्हणजे तुमच्या पोटात गव्हासोबत डाए टरी फा यबरही जाते. भाज्या पोटात गेल्यास त्या शरीराला प्रो टीन देण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही पोळ्यांसोबत भाजीही खा.

हल्ली डा एट करणाऱ्यांसाठी बाजारात वेगळ्यापद्धतीने तयार करण्यात आलेले गव्हाचे पीठही मिळते. ज्यामध्ये ग्लु टेनचे प्रमाण हे तुलनेने कमी असते. शिवाय यामध्ये संपूर्ण गहू नाही तर अन्य काही घटकांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे तुम्ही त्याची निवड केली तरी चालेल.

गव्हाच्या पिठामध्ये शक्य असेल तर हाय प्रो टिन अशी अन्नधान्य मिसळण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळेही तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो. या शिवाय तुम्ही ब्रा ऊन ब्रे ड, पास्ता अशा गोष्टींचा समावेश करु शकता.

डा एट करताना तुम्हाला लगेचच सगळ्या गोष्टी सोडण्याची गरज नसते. काही गोष्टी तुम्ही नीट जाणून घेतल्या तर तुम्हाला अगदी आरामात त्याचा समावेश आहारात करता येतो.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत जरूर शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.